Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारत- पाक क्रिकेट मालिकेला शरीफशंची हिरवी झेंडी

भारत- पाक क्रिकेट मालिकेला शरीफशंची हिरवी झेंडी
, शुक्रवार, 27 नोव्हेंबर 2015 (10:57 IST)
इस्लामाबाद- भारत आणि पाकिस्तान यांच्यातील द्विपक्षीय क्रिकेट संबंध पुन्हा प्रस्थापित करण्याच्या दृष्टीने पुढील महिन्यात दोन्ही देशांमध्ये खेळविण्या येणार्‍या प्रस्तावित मालिकेला पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ यांनी हिरवी झेंडी दा‍खविल्याचे वृत्त असून यामुळे ही मालिका होणार हे जवळपास निश्चित झाले आहे.
 
श्रीलंकेत भारत- पाक मालिका खेळविण्यास शरीफ यांनी मंजुरी दिली असल्याचे सूत्रांच्या हवाल्याने देण्यात असलेल्या वृत्तात म्हटले आहे. या त्रयस्थ मालिकेसाठी तयारी करणार्‍या श्रीलंकन क्रिकेटच्या सूत्राने म्हटले असले तरी पाकिस्तानसंबंधीच्या आयसीसीच्या कार्यकरी गटाचे अध्यक्ष क्लार्क आईल्स यांनी अधिकृत घोषणा केल्यानंतरच यासंबंधी व्क्तव्य दिले जाईल, असेही सूत्राने सांगितले.
 
बीसीसीआयनेही भारत-पाक मालिकेसाठी भारत सरकारकडे परवानगी मागितली असून, लवकरच मालिकेसंबंधी अधिकृत घोषणा होण्याची शक्यता आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi