Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारत-पाक झुंज सुपर -8 फेरीतच

भारत-पाक झुंज सुपर -8 फेरीतच

वेबदुनिया

PR
श्रीलंकेत सुरू असलेल्या टी-20 विश्वचषक स्पर्धेत भारत आणि पाकिस्तान या पारंपारिक प्रतिस्पर्ध्यांदरम्यान उपांत्य किंवा अं‍‍तिम फेरीत झुंज व्हावी, अशी तमाम क्रिकेटप्रेमींची आशा, परंतु या दोन्ही संधांदरम्यान सुपर-8 फेरीतच लढत होण्याची शक्यता आहे.

भारताने साखळी फेरीतील दोन्ही सामने जिंकून अ गटातून अव्वल स्थान पटाकवले. त्यामुळे सुपर-8 फेरीत भारताला अ-1 हे मानांकन मिळणे अपेक्षित होते, परंतु स्पर्धेच्या नियमावलीनुसार भारत अ-2 म्हणूनच सुपर-8 फेरीत दाखल होईल. भारतास 'अ' गटात दुसरे मानांकन होते, त्यामुळे गटातील सर्व लढती भारताने जिंकल्या तरी, भारत अ-2 राहणार हे स्पष्ट होते.


Share this Story:

Follow Webdunia marathi