Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारत विडींजमध्ये आज पहिला सामना

भारत विडींजमध्ये आज पहिला सामना

भाषा

किंगस्टन , शुक्रवार, 26 जून 2009 (14:27 IST)
भारत आणि वेस्ट इंडीजदम्यान चार एकदिवशीय सामन्यांची ही मालिका आजपासून (ता.26) पासून सुरु होत आहे. भारतीय वेळेनुसार रात्री आठ वाजता सामने सुरु होणार आहेत.

कर्णधार महेंद्रसिंह धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघ टी-20 मधील अपयश धुवून काढण्यासाठी तयार आहे. वरिष्ठ खेळाडूंच्या अनुपस्थितीत युवा खेळाडू कशी कामगिरी करता यावरच मालिकेतील भारताचे भवितव्य अवलंबून राहणार आहे. भारतीय संघात निवड झालेल्या 16 खेळाडूंपैकी 11 खेळाडूंना विडींजमध्ये खेळण्याचा अनुभव नाही. कर्णधार महेंद्रसिंह धोनी, युवराज, हरभजनसिंग, आशीष नेहरा आणि आर.पी. सिंह विडींजमध्ये खेळले आहे.

विडींजमध्ये भारत 23 सामने खेळला आहे. त्यात 17 सामन्यांमध्ये पराभव झाला आहे. यामुळे भारतीय संघाला विजयासाठी कठोर मेहनत घ्यावी लागणार आहे.

भारतीय संघ : महेन्द्रसिंह धोनी (कप्तान), युवराज सिंह, हरभजनसिंग, आशीष नेहरा, आर.पी. सिंह, गौतम गंभीर, रवींद्र जडेजा, दिनेश कार्तिक, प्रवीण कुमार, अभिषेक नायर, प्रज्ञान ओझा, यूसुफ पठाण, ईशांत शर्मा, रोहित शर्मा, मुरली विजय आणि एस. बद्रीनाथ.

वेस्ट इंडीज संघ : क्रिस गेल (कप्तान), शिवनारायण चंद्रपाल, रामनरेश सरवन, लिनोल बेकर, सुलेमान बेन, डवेन ब्रावो, डेविड बर्नाड, डैरेन ब्रावो, नरसिंह देवनारायण, दिनेश रामदीन, रूनाको मोर्टन, रवी रामपाल आणि जेरोम टेलर.

Share this Story:

Follow Webdunia marathi