Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माजी क्रिकेटर विनोद कांबळीचे पुन्हा स्वयंवर!

माजी क्रिकेटर विनोद कांबळीचे पुन्हा स्वयंवर!
मुंबई , सोमवार, 5 मे 2014 (16:45 IST)
भारतीय क्रिकेट संघाचा माजी क्रिकेटर विनोद कांबळी याने पुन्हा एकदा स्वयंवर केले आहे. विनोदने पत्नी अँड्रिया हेवित हिच्यासोबत पारंपारिक पद्धतीने विवाह केला आहे. यापूर्वी विनोदने अँडियासोबत कोर्ट मॅरेज केले होते.

विनोदने वांद्रे येथील पीटर्स चर्चामध्ये कॅथलिक पद्धतीने विवाह केला. विशेष म्हणजे ख्रिश्चन धर्मातील सर्व विवाहासंदर्भाती सर्व परंपराही त्याने निभावल्या. गेल्या शनिवारी (3 मे) झालेल्या विवाहसोहळ्यात त्याचा मुलगा बेटा जीसस क्रिस्टियानो याच्यासह अभिनेता आशुतोष राणा आणि रेणुका उपस्थित होते.

विनोद आता खूप आध्यात्मिक झाला आहे. आपल्या समाजिक रुढी-परंपरांवर त्याचा विश्वास आहे. नोव्हेंबरमध्ये त्याला हार्ट अटॅक आला होता. त्यानंतर त्याच्यात हे परिवर्तन झाल्याचे विनोदच्या नातेवाईकांनी सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi