Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

मुंबई - पंजाब पहिल्या विजयाच्या शोधात

मुंबई - पंजाब पहिल्या विजयाच्या शोधात
मुंबई , रविवार, 12 एप्रिल 2015 (09:04 IST)
आठव्या आयपीएलमधील सलामीच्या सामन्यात पराभवाचा झटका बसलेले मुंबई इंडियन्स आणि किंग्ज इलेव्हन पंजाब हे दोन संघ स्पर्धेतील पहिला विजय मिळवण्यासाठी रविवारी वानखेडे स्टेडियमवर उतरतील. 
 
यंदाच्या आयपीएलमधील पहिल्याच सामन्यात गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने मुंबई इंडियन्सचा ७ खेळाडू राखून तर राजस्थान रॉयल्सने किंग्ज इलेव्हन पंजाबवर केवळ एक धावेने विजय मिळवला. मुंबई इंडियन्सचा कर्णधार रोहित शर्माने ६५ चेंडूंत १२ चौकार आणि ४ षटकारांच्या सहाय्याने नाबाद ९८ धावा केल्या तर कोरे अँडर्सनने ४१ चेंडूंत नाबाद ५५ धावा फटकावल्यामुळे मुंबई इंडियन्सने २0 षटकांत ३ खेळाडूंच्या मोबदल्यात १६८ धावा केल्या. हे अशक्य प्राय आव्हान गतविजेत्या कोलकाता नाईट रायडर्सने १८.३ षटकांत ३ खेळाडूंच्या मोबदल्यात पार केले. लसिथ मलिंगाने टिच्चून गोलंदाजी केली पण त्याला एकही बळी मिळवता आला नाही. यंदाची रणजी स्पर्धा गाजवणार्‍या आर. विनयकुमारलाही बळी मिळाला नाही. हरभजन सिंगने ४ षटकांत ३८ धावा देऊन १ बळी मिळवला, तर अनुभवी प्रज्ञान ओझाच्या २ षटकांत २३ धावा फटकावण्यात आल्या. किंग्ज इलेव्हन पंजाब संघात ग्लेन मॅक्सवेल, डेव्हिड मिलर, शॉन मार्श, जॉर्न बेली यासारखे फटकेबाज फलंदाज आहेत. वीरेंद्र सेहवागला पहिल्या सामन्यात भोपळाही फोडता आला नाही. या फलंदाजाला रोखण्याची जबाबदारी मुंबई इंडियन्स संघावर आहे. 
 
गतवर्षी अंतिम सामन्यांपर्यंत धडक मारलेल्या किंग्ज इलेव्हन पंजाब संघाचा कर्णधार जॉर्ज बेलीने राजस्थान रॉयल्स विरुद्धच्या सामन्यात फलंदाजांच्या क्रमांकात बदल केले आणि त्यामुळेच त्यांना २६ धावांनी पराभव पत्करावा लागला. आपण केलेल्या चुकीची कबुली बेलीने दिली आहे. त्या सामन्यात रिद्धीमान साह आणि ३७ धावा करून जम बसलेला मुरली विजय हे विनाकारण धावचीत झाले आणि त्याचा फटका किंग्ज इलेव्हन पंजाबला नक्कीच बसला. मुंबई इंडियन्ससारख्या तगड्या संघाविरुद्ध अशा अक्षम चुका करून विजय मिळवता येणे शक्य नाही. विश्‍वचषक स्पर्धा गाजवणार्‍या ग्लेन मॅक्सवेल आणि डेव्हिड मिलरना चांगली कामगिरी करता आली नाही. विश्‍वचषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात भेदक गोलंदाजी करणार्‍या मिचेल जॉन्सनने २ बळी घेतले पण त्यासाठी त्याने ३४ धावा मोजल्या. 
 
रविवारचा सामना हा घरच्या वानखेडे स्टेडियमवर होणार असल्यामुळे मुंबई इंडियन्सला काहीसा लाभ मिळेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi