Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

म्हणून #SachinTeaser करत आहे ट्रेंड ...

म्हणून #SachinTeaser करत आहे ट्रेंड ...
, शुक्रवार, 15 एप्रिल 2016 (12:59 IST)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरच्या आयुष्यावर आधारित असलेल्या 'सचिन अ बिलियन ड्रीम्स'या चित्रपटाचा टीझर अखेल रिलीज झाला आहे. सचिन तेंडुलकरनेच ट्विटरवर टिझर रिलीज केले आहे. यापूर्वी सचिननेच पोस्टर रिलीज केले होते.  
 
विशेष म्हणजे या चित्रपटात खुद्द सचिन तेंडुलकरच स्वत:ची व्यक्तिरेखा साकारणार आहे. मुंबईतील '200 नॉट आऊट' या प्रॉडक्शन कंपनीने हा चित्रपट बनवला असून जेम्स अर्सकिन यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.  
 
या टिझरमध्ये 'मेरे बाबा मुझे हमेशा कहते थे, तुमने जिंदगी में क्रिकेट को चुना है ये एक बात है, लेकिन आखिर तक जो बात  तुम्हारे साथ रहेगी वो ये होगी की तुम इन्सान कैसे होंगे, हा संवाद ऐकायला मिळतो. 
 
सोशल मिडियावर टिझर आणि सचिनच्या नावाचे  हैशटैग जबरदस्त ट्रेंड करत आहे आणि टिझर लांच झाल्यानंतर या हैशटैगचा वापर बर्‍याच वेळा झाला आहे आणि हा सर्वात जास्त ट्रेंड करत आहे. 
 
खेळ, फिल्मी स्टार्स, राजकारणातील लोक या हैशटैगचा वापर करून ट्विटकरून सचिनचे अभिनंदन करत आहे. सचिनने स्वत: ट्विटवरवर फॅन्सच्या सपोर्टसाठी त्यांचे धन्यवाद दिले आहे. 

Share this Story:

Follow Webdunia marathi