Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

युवराजवर होणार शेवटची केमोथेरोपी

युवराजवर होणार शेवटची केमोथेरोपी

वेबदुनिया

नवी दिल्ली , मंगळवार, 13 मार्च 2012 (16:45 IST)
WD
भारताचा क्रिकेटपटू युवराजसिंगच्या चाहत्यांसाठी एक आनंदाची बातमी आहे. अमेरिकेतील बोस्टन येथे कॅन्सरवर उपचार घेत असलेल्या युवराजसिंगवरील केमोथेरेपीचा शेवटचा लवकरच पूर्ण करण्यात येणार आहे.

युवराजसिंगने ट्विटरहून ही माहिती देत ट्विट केले आहे. या ट्विटमध्ये युवराजने म्हटले आहे, की केमोथेरेपीचा शेवटच्चा टप्पा पूर्ण होण्यासाठी फक्त चार दिवस राहिले आहेत. त्यानंतर मी मोकळा होऊ शकेल. या ट्विटबरोबर युवराजने रुग्णालयातील छायाचित्रही प्रसिद्ध केले आहे.

युवराजने गेल्या गुरुवारी आपले टेबल टेनिस खेळतानाचे छायाचित्र प्रसिद्ध केले होते. युवराजच्या कॅन्सरवर गेल्या अनेक दिवसांपासून येथे उपचार सुरु आहेत.

Share this Story:

Follow Webdunia marathi