Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

वीरू ‍'फिट', केकेआरविरुद्ध खेळणार

वीरू ‍'फिट', केकेआरविरुद्ध खेळणार
WD
दिल्ली डेअरडेव्हिल्सच्या वीरेंद्र सेहवागने फिटनेस टेस्ट पास केली असून चॅम्पियन लीगमध्ये शनिवारी कोलताता नाईट रायडर्सविरुद्ध होणार्‍या लढतीसाठी सज्ज झाला आहे. श्रीलंकेत नुकत्याच झालेल्या टी-20 वर्ल्डकपमध्ये द. आफ्रिकेविरुद्ध लढतीत सेहवागच्या घोट्यात दुखापत झाली होती. यासंदर्भात वीरूची काल फिटनेस चाचणी घेण्यात आली.

सिडनी सिक्सर्सविरुद्ध झालेल्या सारव लढतीतही सेहवाग खेळला. मात्र त्याला भोपळाही फोडता आला नाही. जॉश हेजलवुडच्या एका यॉर्करवर त्याची दांडी उडाली. बिग बॅशचे चॅम्पियन असलेल्या सिडनी सिक्सर्सविरुद्ध दिल्लीला फक्त 107 धावा करता आल्या.

Share this Story:

Follow Webdunia marathi