Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

शाहरुखने प्रेक्षकाला दाखवला बूट

शाहरुखने प्रेक्षकाला दाखवला बूट

वेबदुनिया

पुणे , गुरूवार, 24 मे 2012 (11:39 IST)
WD
कोलकता नाईट रायडर्स संघाने दिल्ली डेअर डेव्हिल्स संघाचा पराभव करीत आयपीएलच्या पाचव्या सत्रात अंतिम फेरीत प्रवेश केला. यादरम्यान कोलकता संघाचा सहमालक व अभिनेता शाहरुख खान याने एका प्रेक्षकाने केलेल्या शेरेबाजीला उत्तर देताना स्वत:च्या बुटाकडे बोट दाखविले. शाहरुखच्या या कृत्यामुळे मैदानात उपस्थित प्रेक्षकांनी नाराजी व्यक्त केली.

आयपीएलच्या पाचव्या सत्रात उपांत्य फेरीचा सामना पुणे येथील सुब्रतोरॉय सहारा स्टेडियमवर झाला. सामना संपताच शाहरुखने आपल्या मुलांसह मैदानात धाव घेतली आणि आनंद साजरा केला. मैदानावर तो फेरी मारत असताना एका प्रेक्षकाने त्याच्याकडे पाहून शेरेबाजी केली. शेरेबाजीमुळे चिडलेल्या शाहरुखने त्याच्याकडे पाहून आपल्या बुटाकडे बोट दाखविले।

Share this Story:

Follow Webdunia marathi