Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

श्रीलंकेसमोर 'चोकर्स'चा ठप्पा पुसण्याचे आव्हान

श्रीलंकेसमोर 'चोकर्स'चा ठप्पा पुसण्याचे आव्हान
हंबनटोटा , मंगळवार, 18 सप्टेंबर 2012 (15:52 IST)
PR
ट्वेंटी-२० विश्वकरंडकात फायनलमध्ये धडक दिल्यानंतरही करंडकापासून वंचीत राहिलेल्या श्रीलंकेसमोर 'चोकर्स'चा ठप्पा हटवण्याचे आव्हान आहे. आज प्रारंभीच्या लढतीत झिम्बाब्वे विरूद्ध त्यांचा मुकाबला रंगणार आहे.

श्रीलंकेने गेल्या पाच वर्षात विश्वकरंडकासाठी ३ वेळा फायनलमध्ये धडक दिली, मात्र त्यांच्या पारड्यात अपयशच पडले. वनडे विश्वकरंडकात ते २००७ व २०११ मध्ये फायनलमध्ये खेळले आणि ट्वेंटी-२० विश्वकरंडकात २००९ मध्ये ते करंडकासाठी लढले, मात्र त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. त्यांना अनुक्रमे ऑस्ट्रेलिया, भारत व पाकिस्तानने पराभूत केले होते.

कर्णधार महेला जयवर्धनेवर या आव्हानांचा विशेष प्रभाव नसून त्याला दमदार प्रदर्शनाचा पूर्ण विश्वास आहे. देशातील क्रिकेट चाहत्यांचे आपल्या संघास समर्थन मिळेल आणि संघसहकार्‍यास संपूर्ण झोकून देण्यासोबतच संधीचा पूर्ण लाभ उठवण्यास सांगितल्याने तो निर्धास्त आहे. घरगुती मैदानावर विश्वकरंडक खेळणे सुखद अनुभव असल्याचे, तो सांगतो.

Share this Story:

Follow Webdunia marathi