Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सचिन इज द बेस्ट-अब्बास

सचिन इज द बेस्ट-अब्बास

वेबदुनिया

कराची , सोमवार, 8 नोव्हेंबर 2010 (13:32 IST)
मास्टर ब्लास्टर सचिन तेंडूलकर याच्या चाहत्यांची संख्‍या कमी नाही. त्याच्यासोबत खेळणारे त्याचे सहकारी तसेच दुसर्‍या देशाचे खेळाडूही त्याचे चाहते आहेत. पाकिस्तानचे माजी कर्णधार जहीर अब्बास हेही त्यातलेच आहेत. काही झाले तरी सचिन सारखा दुसरा खेळाडू नसल्याचे त्यांनी म्हटले आहे.

सचिन क्रिकेटचा देव आहे. त्याचा सारखा दुसरा खेळाडू कोणताही होणार नाही. डॉन ब्रॅडमन यांच्यानंतर फक्त सचिनच त्यांची बरोबरी करु शकतो असेही अब्बास यांनी म्हटले आहे.

ब्रॅडमन यांना प्रत्यक्षाक खेळताना आपण कधीही पाहिले नाही, सचिनचा खेळ आपण जवळून पाहिला आहे, त्याचा सारखा दुसरा खेळाडू होणे अशक्य असल्याचे अब्बास यांनी म्हटले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi