Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सचिन निवृत्तीचा विचार करतोय!

सचिन निवृत्तीचा विचार करतोय!
, शुक्रवार, 5 ऑक्टोबर 2012 (15:18 IST)
ND
ND
क्रिकेटचा देव सचिन तेंडुलकर याने नोव्हेंबरमध्ये मायदेशात होणार्‍या इंग्लंडविरूद्धच्या मालिकेदरम्यान निवृत्तीबाबत ठरवेन, असे त्याने खुद्द स्पष्ट केले आहे.

आपण आता ३९ वर्षाचे झालो असून कायमचं क्रिकेट खेळत राहील, असे नाही. गेल्या २३ वर्षापासून आपण क्रिकेट खेळत असून मानसिक कणखरता आणि शारीरिक तंदुरूस्तीवर हा निर्णय अवलंबून असेल.

या वयात आपल्यात खूप क्रिकेट राहिले, असे वाटत नसून आपण अपेक्षेनुरूप कामगिरी करू शकत नाहीये, असे वाटल्यास आढावा घेऊन निवृत्तीबाबत अंतिम निर्णय घेऊ असे त्याने एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत स्पष्ट केले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi