Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सचिन बनणार अठरा हजारी मनसबदार

सचिन बनणार अठरा हजारी मनसबदार
सचिन तेंडुलकर वनडे क्रिकेटमध्ये १८,००० धावा पूर्ण करण्यापासून काही पावलं दूर असून विश्वकरंडकातील विंडीजविरूद्धच्या साखळी सामन्यात तो अठरा हजारी मनसबदार बनू शकतो.

विश्वकरंडकात दोन शतकांसहित ३२४ धावा करणार्‍या सचिनला अठरा हजार धावांसाठी फक्त ४७ धावांची गरज आहे. त्याने ४४९ वनडे सामन्यात ४३८ डाव खेळत ४५.२२ इतक्या सरासरीने १७९५३ केल्या आहेत. सद्या सुरू असलेल्या विश्वकरंडकात सचिन चांगलाच फॉर्म मध्ये असून इंग्लंड आणि दक्षिण आफ्रिकेसारख्या तगड्या संघांविरूद्ध त्याने शतकं ठोकली आहे. विंडीजविरूद्ध खेळण्यासाठी आल्याबरोबर ४५० वनडे सामने खेळणारा जगातील पहिला खेळाडू बनेल.

Share this Story:

Follow Webdunia marathi