Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सचिन सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू - पाँटिंग

सचिन सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू - पाँटिंग

वेबदुनिया

WD
आतापर्यंत ज्या क्रिकेटपटूंच्या विरोधात खेळलो, त्यातील सर्वोत्कृष्ट क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर होता, असे मत ऑस्ट्रेलियाचा महान फलंदाज रिकी पाँटिंगने व्यक्त केले आहे. पर्थ मैदानावर दक्षिण आफ्रिकेविरुद्ध शेवटचा कसोटी क्रिकेट सामना खेळून पाँटिंगने सोमवार आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा केले, त्यावेळी निरोप समारंभात तो बोलत होता. तुझ्या काढातला सर्वात उत्तम फलंदाज कोण, असा प्रश्न त्याला विचारण्यात आला होता. त्यावर पाँटिंग ने मी ज्यांच्याविरोधात खेळतो, त्यांच्यापैकी सचिन सर्वात उत्तम फलंदाज होता आणि एक कर्णधार म्हणूनही माझे हेच मत आहे. सचिनने मायदेशात आणि ऑस्ट्रेलियात दोन्हीकडेही उत्तुंग यश मिळवले आहे, असेही त्याने सांगितले.

Share this Story:

Follow Webdunia marathi