Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ह्युजला अखेरचा ‘गुड बाय’

ह्युजला अखेरचा ‘गुड बाय’
मॅक्सविले , गुरूवार, 4 डिसेंबर 2014 (10:40 IST)
उसळता चेंडू लागून मृत्यू झालेला क्रिकेटपटू फिलिप ह्युज याला अखेरचा निरोप दिला. मॅक्सविले येथे त्याची अंत्ययात्रा काढण्यात आली, त्यावेळी क्रीडा जगतासह आॅस्ट्रेलियातील अनेक नागरिकांनी हजारोंच्या संख्येने उपस्थिती लावली होती.
 
अंत्यसंस्काराचे थेट प्रक्षेपण करण्यात आले होते. आॅस्ट्रेलियन क्रिकेटपटू, कुटुंब, मित्र, नातेवाइक आणि चाहत्यांनी ह्युजला अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती. हजारो नागरिकांमध्ये उपस्थित असलेल्या आॅस्ट्रेलियाचे पंतप्रधान टोनी एबोट यांनाही आपल्या भावनांवर आवर घालता आली नाही. यावेळी शेन वॉर्न, रिकी पॉटिंग, ग्लेन मॅकग्रा, ब्रायर लारा, रिचर्ड हेडली, विराट कोहली आदी दिग्गज क्रिकेटपटूंचीही उपस्थिती होती. ह्युजचे वडिल आणि भावासह क्लार्क, अरोन फिंच यांनी ह्युजच्या कॉफिनला खांदा दिला.

Share this Story:

Follow Webdunia marathi