Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
Wednesday, 2 April 2025
webdunia

1983 विश्वचषक विजेता यशपाल शर्मा यांचे निधन

1983 World Cup winner Yashpal Sharma dies of heart attack
, मंगळवार, 13 जुलै 2021 (11:21 IST)
1983 विश्वचषक विजेता यशपाल शर्मा यांचे आज सकाळी हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 66 वर्षांचे होते. 
 
यशपाल शर्माने आपल्या कारकीर्दीत 37 कसोटी आणि 42 एकदिवसीय सामने खेळले. कसोटीत त्याच्या नावावर 1606 धावा आहेत, तर एकदिवसीय सामन्यात 883 धावा बनल्या आहेत. यशपालने कसोटी क्रिकेटमध्ये 2 शतके आणि 9 अर्धशतके ठोकण्याचा विक्रम केला आहे. त्याचवेळी या माजी भारतीय खेळाडूने वन डेमध्ये 4 अर्धशतकेही खेळली होती. 1983 च्या विश्वचषकात यशपाल शर्माने भारताला विश्वविजेते बनवण्यामध्ये सर्वात महत्वाची भूमिका बजावली होती. विशेषतः सेमी-फाईलमधील इंग्लंडविरुद्धच्या सामन्यात त्याने केलेला डाव कायमस्मरणीय आहे. यशपाल जीने उपांत्य सामन्यात 61 धावांचे महत्त्वपूर्ण खेळी खेळल्यामुळे भारताला अंतिम फेरी गाठणे सोपे झाले.
 
नुकतेच यशपाल शर्मा यांनी ज्येष्ठ अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाबद्दल खुलासा केला होता. 1983 च्या विश्वचषकात ते क्रांती हा चित्रपट बघायचे ज्याने त्यांच्यात ऊर्जा निर्माण होत असे. यशपाल शर्मा यांच्या निधनाने भारतीय क्रिकेटचा सुवर्णकाळसुद्धा त्याच्याबरोबर गेला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

चंद्रपूरमध्ये जनरेटरच्या धूरांमुळे एकाच कुटुंबातील 6 जणांचा मृत्यू, 1 गंभीर जखमी