जिथे इंग्लंडमध्ये अॅशेस मालिका सुरु झाली आहे . त्याचबरोबर सध्या क्लब क्रिकेटही सुरू आहे. ज्यामध्ये 12 वर्षीय खेळाडूने आपल्या गोलंदाजीने धुमाकूळ घालत जबरदस्त करिश्मा निर्माण केला. ऑलिव्हर व्हाइटहाऊस असे इंग्लंडमध्ये खेळणाऱ्या या युवा खेळाडूचे नाव आहे. ज्याने एका षटकातील 6 चेंडूत एक-दोन नव्हे तर 6 विकेट्स घेऊन दुहेरी हॅट्ट्रिक केली. त्यामुळे या गोलंदाजाचे नाव चर्चेत आले आणि त्याने आपल्या ब्रूम्सग्रोव्ह क्रिकेट क्लबला 153 धावांचा मोठा विजय मिळवून दिला
इंग्लंडमध्ये 12 वर्षांखालील क्रिकेट स्पर्धेदरम्यान ब्रूम्सग्रोव्ह क्रिकेट क्लब आणि कुकहिल क्लब यांच्यात सामना झाला. ज्यामध्ये 200 धावांच्या पुढे खेळताना ब्रॉम्सग्रोव्ह क्रिकेट क्लबने एकूण 329 धावा केल्या. याला प्रत्युत्तर म्हणून ऑलिव्हरच्या गोलंदाजीसमोर कुकहिल क्लबचा संघ 15 षटकांत 51 धावांत गारद झाला. तर निव्वळ धावसंख्या केवळ 176 धावा करू शकली. यादरम्यान डावखुरा फिरकीपटू ऑलिव्हरने दोन षटके टाकली आणि एकूण आठ बळी घेतले. ज्यामध्ये ऑलिव्हरने 6 चेंडूत सलग 6 विकेट घेत दुहेरी हॅट्ट्रिक केली. तर एकही धाव दिली नाही. त्यामुळे त्यांचा हा करिष्मा व्हायरल झाला. ऑलिव्हरच्या ब्रुम्सग्रोव्ह क्रिकेट क्लबने हे छायाचित्र सोशल मीडियावर पोस्ट केले आणि काही वेळातच ते व्हायरल झाले.