महेंद्रसिंग धोनीची गणना भारताच्या महान कर्णधारांमध्ये केली जाते. धोनीच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने तीन आयसीसी विजेतेपद पटकावले. धोनीने 2020 मध्येच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली. धोनीने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती घेतली असली तरी तो अजूनही आयपीएलमधील चेन्नई सुपरकिंग्जचा (CSK) भाग आहे. आगामी आयपीएल हंगामातही धोनी सीएसकेचे नेतृत्व करणार आहे.
धोनीची फॅन फॉलोइंग जबरदस्त आहे. तामिळनाडूच्या कुड्डालोर जिल्ह्यातील रहिवासी असलेले गोपी कृष्णन हे देखील धोनी आणि त्याच्या टीम सीएसकेचे कट्टर चाहते होते. गोपी कृष्णन यांनी त्यांच्या घराला पिवळा रंग दिला होता, जो CSK चा पारंपारिक रंग आहे. गोपीने आपल्या घराचे नाव 'होम ऑफ धोनी फॅन' असे ठेवले होते. 2020 मध्ये, CSK फ्रेंचाइजीने या चाहत्याचा फोटो शेअर केला होता.
आता गोपी कृष्णन यांच्याबाबत एक दु:खद बातमी समोर येत आहे. गोपी कृष्णन यांनी गुरुवारी (18 जानेवारी) आत्महत्या केली गोपी कृष्णन यांचा शेजारील गावातील काही लोकांशी वाद सुरू होता, याला कंटाळून त्यांनी हे पाऊल उचलले. गोपीचा भाऊ आणि स्थानिक पोलिसांनीही याला दुजोरा दिला.
'माझ्या भावाचा शेजारच्या गावातील काही लोकांशी आर्थिक वाद होता. नुकतेच गोपीचे त्याच्याशी भांडण झाले आणि त्यात तो जखमी झाला. या घटनेनंतर तो अस्वस्थ झाला गोपीने जुन्या वैमनस्यातून आत्महत्या केली आहे. रामनाथम पोलिसांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली आहे.
गोपी कृष्णनच्या घरचा व्हायरल झालेला व्हिडिओ एमएस धोनीपर्यंत पोहोचला होता. व्हिडिओ पाहून धोनी खूप खूश झाले .