पाकिस्तानचा क्रिकेटपटू अहमद शेहजाद डोपिंग टेस्टमध्ये दोषी आढळला आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने (पीसीबी) या वृत्ताला दुजोरा दिला आहे. आता या प्रकरणानंतर अहमद शेहजादची चौकशी केली आहे. याबाबत ‘पीसीबी’ने आपल्या ट्विटर अकाऊंटकर यासंदर्भातील माहिती दिली.
पाकिस्तानचा फलंदाज अहमद शेहजाद उत्तेजक द्रव्य सेवन चाचणीत दोषी आढळला आहे. अहमद शेहजादने गेल्या महिन्यात स्कॉटलंडविरुद्ध दोन टी-२० सामने खेळले होते. २६ वर्षीय या खेळाडूने आतापर्यंत १३कसोटी आणि ८१ वन डे सामन्यांमध्ये पाकिस्तानी संघाचे प्रतिनिधित्व केले आहे. चौकशी पूर्ण झाल्यानंतर अहमद शेहजादवर आरोपांची निश्चिती करून शिक्षा सुनाविण्यात येईल अशी माहिती पाक क्रिकेट बोर्डाच्या अधिकाऱ्याने दिली.