Publish Date: Mon, 02 Jan 2017 (17:08 IST)
Updated Date: Mon, 02 Jan 2017 (17:14 IST)
सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करण्यात अनुराग ठाकूर आणि सचिव अजय शिर्के दोघांनाही अपयश आल्याने त्यांची पदावरून हकालपट्टी केली असून न्यायमूर्तींनी दोघांवर ताशेरे ओढले आहेत. खोटी साक्ष दिल्याप्रकरणी अनुराग ठाकूर यांच्यावर अवमानाचा खटलाही चालणार आहे. सर्वोच्च न्यायालयाने ठाकूर यांना आपली भूमिका मांडण्यासाठी अवधीही आहे. 18 जुलैला झालेल्या सुनावणीत सर्वोच्च न्यायालयानं लोढा समितीच्या शिफारशी स्वीकारण्याचा आदेश बीसीसीआयला दिला होता. पण बीसीसीआय आणि राज्य क्रिकेट संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी त्या आदेशाची अंमलबजावणी केलेली नसल्याचं कोर्टानं नमूद केलं.