Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

विराटचा नव्या वर्षात साखरपुडा!

विराटचा नव्या वर्षात साखरपुडा!
डेहरादून- भारतीय कसोटी क्रिकेट संघाचा कर्णधार विराट कोहली आणि अनुष्का शर्मा लवकरच साखरपुडा करणार असल्याची चर्चा आहे. नववर्षात विराट आणि अनुष्का साखरपुडा करतील, असे म्हटले जात आहे. न्यू इयर सेलिब्रेशनसाठी विराट आणि अनुष्का सध्या उत्तराखंडमधील नरेंद्रनगरच्या हॉटेल आनंदामध्ये आहेत.
महत्त्वाचे म्हणजे विराट आणि अनुष्काच्या साखरपुड्याला बॉलीवूडचे महानायक अमिताभ बच्चन यांच्यासह अनेक सेलिब्रिटी उपस्थित राहण्याची शक्यता आहे. विराट आणि अनुष्का मागील काही वर्षांपासून रिलेशनशिपमध्ये आहेत. नव्या वर्षात दोघांचा साखरपुडा होईल असे म्हटले जात आहे.
 
ज्या हॉटेलमध्ये दोघे थांबले आहेत, तिथे नातेवाईकांचा राबता वाढत आहे. एका वृत्तपत्रानुसार, या दोघांच्या साखरपुड्याला उत्तराखंडचे मुख्यमंत्री हरीश रावतही 1 जानेवारीला येथे पोहचणार आहे. मात्र साखरपुड्याबाबत अनुष्का आणि विराटकडून अद्याप अधिकृत दुजोरा मिळाले नाही.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

प्रथमच सह पालकमंत्री निवड तर नवीन पालकमंत्री नियुक्त