ICC पुरुष T20I क्रिकेटर ऑफ द इयर: चार खेळाडूंना ICC पुरुष T20I क्रिकेटर ऑफ द इयरसाठी निवडण्यात आले आहे. यामध्ये भारताचा अर्शदीप सिंग, पाकिस्तानचा बाबर आझम, ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड आणि झिम्बाब्वेचा सिकंदर रझा यांना संधी मिळाली आहे. आता हा पुरस्कार कोणाला मिळणार? फक्त वेळच सांगेल. पण 2024 मध्येच या चारही खेळाडूंनी चमकदार कामगिरी केली आहे.
अर्शदीप सिंगने भारतीय संघाला T20 विश्वचषक 2024 चे विजेतेपद मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 2024 च्या टी20विश्वचषकात सर्वाधिक विकेट घेणारा तो भारतीय गोलंदाज होता. त्याने एकूण 17 विकेट घेतल्या.
गेल्या काही वर्षांत, अर्शदीप सिंग हा T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील भारतीय वेगवान गोलंदाजी आक्रमणातील महत्त्वाचा दुवा म्हणून उदयास आला आहे. त्याने 2024 मध्ये टीम इंडियाला अनेक सामने स्वबळावर जिंकून दिले आहेत. या वर्षी त्याने 18 T20I सामने खेळले आहेत, ज्यात त्याने 36 विकेट घेतल्या आहेत. या डाव्या हाताच्या वेगवान गोलंदाजाने टीम इंडियासाठी सर्व परिस्थितीत दमदार कामगिरी दाखवली आहे. वेस्ट इंडिज, श्रीलंका आणि दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिका जिंकण्यात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याची उत्कृष्ट कामगिरी लक्षात घेऊन त्याला ICC पुरुष T20I क्रिकेटर ऑफ द इयरसाठी निवडण्यात आले आहे.