Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

आयसीसी गोलंदाजीच्या क्रमवारीत अश्विन-जडेजा अव्वल!

आयसीसी गोलंदाजीच्या क्रमवारीत अश्विन-जडेजा अव्वल!
, सोमवार, 2 जानेवारी 2017 (11:30 IST)
दुबई- रविचंद्रन अश्विन व रवींद्र जडेजा यांनी आयसीसी कसोटी गोलंदाजांच्या मानांकन यादीत पहिल्या दोन स्थानी विराजमान असून ताज्या कसोटी मानांकन यादीत भारतीय संघ अव्वलस्थानी कायम राहिला आहे.
 
अश्विनने अष्टपैलू खेळाडूंच्या यादीतही अव्वलस्थना कायम राखले असून रवींद्र जडेजाचे तिसरे स्थान देखील अबाधित राहिले. भारताच्या दोन गोलंदाजांनी कसोटी मानांकनात पहिली दोन स्थाने संपादन करण्याची ही दुसरी वेळ ठरली आहे. यापूर्वी 1974 मध्ये डावखुरे फिरकीपटू बशिन सिंग बेदी व लेगस्पिनर चंद्रशेखर भागवत यांना असा पराक्रम करता आला होता.
 
कसोटी फलंदाजांच्या यादीत भारतीय कर्णधार विराट कोहली दुसर्‍या स्थानी राहिला असून या गटात ऑस्ट्रेलियन कर्णधार स्टीव्ह स्मिथ अव्व्ल राहिला आहे. पाकिस्तानी सलामीवीर अझहर अलीचे मानांकन तब्बल 10 अंकांनी सुधारले असून तो मानांकन यादीत सहाव्या स्थानी पोहोचला आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

सोमदेवचे टेनिसला अलविदा