Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Asia Cup 2022: आशिया कपमध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी होणार

Asia Cup 2022: आशिया कपमध्ये भारताचा सामना पाकिस्तानशी होणार
, सोमवार, 21 मार्च 2022 (16:12 IST)
आशिया कप 2022 च्या तारखा जाहीर झाल्या आहेत. ही स्पर्धा ऑगस्ट आणि सप्टेंबर महिन्यात खेळवली जाणार आहे. या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेकडे देण्यात आले आहे.
आशियाई क्रिकेट परिषदेने आशिया चषक 2022  च्या तारखा जाहीर केल्या आहेत. या स्पर्धेचे यजमानपद श्रीलंकेकडे देण्यात आले आहे. T20 विश्वचषकापूर्वी होणारी ही स्पर्धा फक्त T20 फॉरमॅटमध्ये खेळवली जाईल. पहिला सामना 27 ऑगस्टला, तर अंतिम सामना 11 सप्टेंबरला होणार आहे. आशिया चषक स्पर्धेच्या 15 व्या आवृत्तीत भारतीय संघ आपले विजेतेपद राखण्यासाठी उतरणार आहे. या स्पर्धेसाठी पात्रता फेरीचे सामने 20 ऑगस्टपासून सुरू होतील. यापूर्वी ही स्पर्धा सप्टेंबर 2020 मध्ये होणार होती, परंतु कोरोना महामारीमुळे ती पुढे ढकलण्यात आली होती. यानंतर जून 2021 मध्ये आयोजन करण्याचे ठरले होते, मात्र दुसऱ्यांदा ते पुढे ढकलावे लागले. आता कोरोनाचे रुग्ण कमी झाल्यानंतर परिस्थिती सामान्य झाली असून एजीएमच्या बैठकीत सप्टेंबर महिन्यात त्याचे आयोजन करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. 
 
आतापर्यंत ही स्पर्धा 14 वेळा आयोजित करण्यात आली आहे. श्रीलंकेने चार वेळा यजमानपद भूषवले आहे. 2010 नंतर प्रथमच तो या स्पर्धेचे आयोजन करणार आहे. भारतीय संघ सर्वाधिक सात वेळा चॅम्पियन बनला आहे. त्याचबरोबर श्रीलंकेला पाच वेळा विजेतेपद पटकावण्यात यश आले आहे. पाकिस्तान दोनदा चॅम्पियन बनला असून बांगलादेशला तीनदा अंतिम फेरीत पराभव पत्करावा लागला आहे

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अखेर उंटवाडी उड्डाणपुलाला प्रशासनाचा ‘हिरवा कंदील’