कोरोनाने पुन्हा एकदा दार ठोठावले आहे. आशिया चषक 2023 सुरु होण्यासाठी फक्त 5 दिवस बाकी आहेत, मात्र त्याआधीच श्रीलंकेच्या संघाला मोठा धक्का बसला आहे. आशिया चषक स्पर्धेला 30 ऑगस्टपासून सुरुवात होणार आहे. पाकिस्तान आणि श्रीलंकेत सामने होणार आहेत. या स्पर्धेतील चार सामने पाकिस्तानमध्ये तर नऊ सामने श्रीलंकेत होणार आहेत. आशिया चषक सुरू होण्याच्या पाच दिवस आधी श्रीलंका संघाच्या अडचणी वाढल्या आहेत. त्याचे चार क्रिकेटपटू दुखापती आणि कोरोनाच्या विळ्ख्यामुळे आगामी एकदिवसीय आशिया चषक स्पर्धेतून बाहेर जाऊ शकतात.
. श्रीलंकेच्या संघातील दोन खेळाडूंना कोरोनाची लागण झाली आहे. श्रीलंकेचा रिपोर्टर दानुष्का अरविंदा यांच्या म्हणण्यानुसार, यजमान श्रीलंका संघाचा सलामीवीर अविष्का फर्नांडो आणि यष्टीरक्षक कुसल परेराचा कोविड रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे.
वास्तविक, यजमान श्रीलंकेने आशिया चषक 2023 साठी अद्याप आपला संघ जाहीर केलेला नाही. दरम्यान, स्पर्धेपूर्वी त्याला मोठा धक्का बसला आहे.
श्रीलंका क्रिकेटने याबाबत अधिकृत माहिती दिलेली नाही.
श्रीलंकेला आशिया चषकात 6 दिवसांनी पहिला सामना खेळायचा आहे. यजमान श्रीलंकेचा सामना 31 ऑगस्ट रोजी बांगलादेश (SL vs BAN) होईल. त्याचबरोबर यंदा ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलवर खेळवली जाणार आहे.
पाकिस्तानमध्ये फक्त 4 सामने खेळवले जातील, तर श्रीलंकेत फायनलसह एकूण 9 सामने होतील. स्पर्धेचा अंतिम सामना 17 सप्टेंबर रोजी कोलंबोतील आर प्रेमदासा स्टेडियमवर खेळवला जाईल.फर्नांडो आणि कुसल परेरा कोविड पॉझिटिव्ह आढळण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या वर्षी श्रीलंका आणि झिम्बाब्वेच्या वनडे मालिकेपूर्वी फर्नांडोला कोरोनाची लागण झाली होती. मात्र, बूस्टर डोस असूनही त्याला कोविड झाला. त्याचवेळी कुसल परेराही 2 वर्षांपूर्वी दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या मालिकेपूर्वी या साथीचा रोगाचा बळी ठरला होता.