Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

सावध राहा, भारत पलटवार करण्यात सक्षम : नासीर हुसेनचा इंग्लंडला इशारा

सावध राहा, भारत पलटवार करण्यात सक्षम : नासीर हुसेनचा इंग्लंडला इशारा
नवी दिल्ली , गुरूवार, 11 फेब्रुवारी 2021 (09:25 IST)
पहिल्या कसोटीत भारताचा पराभव केल्याने माजी कर्णधार नासीर हुसेनने इंग्लंडचे कौतुक केले आहे. याशिवाय त्याने इंग्लिश संघाला सावध राहण्याचा इशाराही दिला असून भारतीय संघ पलटवार करण्यात सक्षम असल्याचेही त्याने म्हटले आहे.
 
नासीरने एका लेखात आपले मत मांडताना म्हटले आहे की, इंग्लंडने सर्वांनाच चुकीचे ठरविले. काहीजणांनी तर भारत ही मालिका 4-0 ने जिंकेल असे म्हटले होते. कोणीही इंग्लंडला वियजाचा दावेदार मानले नव्हते. भारतीय संघ आपल्या यलीत होता व त्यांनी नुकतेच ऑस्ट्रेलियाला त्यांच्याच भूमीत पराभूत केले होते. याशिवाय टीम इंडियात विराट कोहलीचेही पुनरागन झाले होते. भारत अशा जागी आहे, जेथून कसोटी सामना जिंकणे कठीण आहे. नासीरने पुढे म्हटले आहे की, मला अपेक्षा आहे की, भारतीय संघ पुनरागन करेल याची इंग्लंडला जाणीव असेल. भारताने ऑस्ट्रेलियात पहिला सामना गमावला होता. त्यानंतर पुनरागमन करताना मालिका जिंकली होती.
 
इंग्लंडने जर दुसर्याम कसोटीत नाणेफेक गमावली तर त्यांना अडचण होऊ शकते. 52 वर्षीय माजी कर्णधाराने विद्यमान कर्णधार जो रूटचेही कौतुक केले. तो म्हणाला की, रूटने द्विशतक झळकावत आपल्या संघाला मजबूत धावसंख्येपर्यंत मजल मारून दिली. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

बँक ग्राहकांसाठी मोठी बातमी, मार्चपासून संप सुरू होईल! बँक कर्मचारी आणि अधिका्यांनी हा निर्णय का घेतला हे जाणून घ्या