पाठदुखीच्या दुखापतीतून पूर्णपणे तंदुरुस्त झालेला सिमर गोलंदाज भुवनेश्वर कुमार याला इंग्लंडविरुद्धच्या तिसर्या क्रिकेट कसोटीसाठी भारताच्या संघात पुन्हा पाचारण करण्यात आले आहे. इंग्लंड संघ सध्या भारताविरुद्ध पाच कसोटी सामन्यांची मालिका खेळत आहे. दुखापतीमुळे रोहित शर्मा या दौऱ्याला मुकला आहे. तर पहिल्या दोन सामन्यांसाठी संघात स्थान मिळालेल्या गौतम गंभीरला उर्वरित तीन सामन्यांमधून वगळण्यात आले आहे. वेगवान गोलंदाज भुवनेश्वर कुमारने संघात पुनरागमन केले आहे. रणजीत भुवनेश्वरने ३६ षटकांत दोन विकेटही घेतल्या होत्या. त्यामुळे त्याचा संघात पुनरागमन करण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. कर्णधारपदाची धूरा विराट कोहलीकडेच असून अजिंक्य रहाणे, मुरली विजय, चेतेश्वर पुजारा, लोकेश राहुल, करुण नायर, वृद्धीमान साहा (यष्टीरक्षक), आर अश्विन, रविंद्र जडेजा, जयंत यादव, अमित मिश्रा, मोहम्मद शमी, उमेश यादव, इशांत शर्मा, भुवनेश्वर कुमार, हार्दिक पांड्या यांचा संघात समावेश करण्यात आला आहे.