Marathi Biodata Maker

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

धोनीची ब्रँड व्हॅल्यू कमी होण्याची शक्यता!

धोनीची ब्रँड व्हॅल्यू कमी होण्याची शक्यता!
अनपेक्षित निर्णय घेण्यात माहिर असलेल्या वनडे आणि टी-20 संघाच्या कर्णधारपदाचा राजीनामा दिल्याने महेंद्रसिंग धोनीची ब्रँड व्हॅल्यू कमी होण्याची शक्यता आहे. आपल्या दमदार खेळाच्या आधारावर क्रिकेटमध्ये वेगळी उंची गाठणारा महेंद्रसिंग धोनी अनेक ब्रँड्सचा आवडता खेळाडू होता. देशभरातील त्याची लोकप्रियता पाहता जाहिरात क्षेत्रातही त्याला चांगली मागणी होती. धोनी प्रत्येक जाहिरातीमागे 8 ते 12 कोटींचे मानधन घेत होता.
 
धोनीची जाहिरीत क्षेत्रातून होणारी वार्षिक कमाई तब्बल 125 ते 150 कोटी इतकी आहे. मात्र, आता कर्णधारपद सोडल्याने हा आकडा खाली होऊ शकतो. जगभरातील सर्वात श्रीमंत शंभर खेळाडूंच्या यादीत धोनीचे नाव आहे. 2016 च्या यादीत धोनीची ब्रँड व्हॅल्यू 2.1 कोटीवरून 1.1 कोटी डॉलरव घसरल्याने नोंद करण्यात आले होते. दरम्यान, रॅकिंगमध्येही घसरण होऊन 5 वरून 10 वर पोहोचला होता. यानंतरही आंतरराष्ट्रीय खेळाडूंच्या यादीत टॉप 10 मध्ये धोनीचा समावेश होता.
 
कर्णधारपद सोडल्याने धोनी आता फक्त एक स्टार खेळाडू असणार आहे. कर्णधारपद सोडल्याने ब्रँड व्हॅलूवर नक्कीच फरत पडतो. राहुल द्रविडच्या बाबतीत हे पाहिले गेले होते, असे जाहिरात क्षेत्रातील संदिप गोयल यांनी सांगितले आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

पेलेटॉनचा थरार, धनराज पिल्ले उपस्थित राहतील