Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

जेव्हा सचिनकडे बससाठी पैसे नव्हते

जेव्हा सचिनकडे बससाठी पैसे नव्हते
Sachin Tendulkar's Birthday अनेक यशस्वी व्यक्तिमत्त्वांनी आपले दिवस गरिबीत घालवले आहेत, परंतु लोक नेहमी त्यांच्या प्रगतीकडे पाहतात, त्यांनी केलेल्या तपस्या कधीच आठवत नाहीत. ती वेदना व्यक्त करण्याचे धाडस फार कमी लोकांमध्ये असते हेही सर्वश्रुत आहे. अशीच एक व्यथा सचिन तेंडुलकरशीही जोडलेली आहे, ती त्याने आपल्या आत्मचरित्रात लिहिली आहे.
 
सचिन तेंडुलकरचा 50 वा वाढदिवस 24 एप्रिल रोजी असल्याने जुनी घटना आठवणे आवश्यक आहे.. ही घटना 35 वर्ष जुनी आहे, जेव्हा सचिन फक्त 12 वर्षांचा होता. या वयात त्यालाही या वयातल्या प्रत्येक मुलाप्रमाणे फास्ट फूड खाण्याची आवड होती, पण हे फास्ट फूड खाणे त्याला इतके महागात पडले की नंतर त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले.
 
सचिन तेंडुलकरने त्याच्या 'प्लेइंग इट माय वे' या आत्मचरित्रात त्याच्या बालपणीची ही घटना कथन केली आहे. सचिन सांगतो की, 1985 मध्ये मी 12 वर्षांचा असताना मुंबईसाठी अंडर 15 सामने खेळण्यासाठी पुण्याला गेलो होतो. वडिलांनी पॉकेटमनीसाठी 95 रुपये दिले. आठवडाभर प्रवास भत्ता म्हणून काही पैसे मिळणार होते. मी पुण्यात एकच सामना खेळलो आणि त्यातही धावबाद झालो.
 
सचिनच्या मते, पुढील काही दिवस पाऊस पडत राहिला आणि मला पुन्हा खेळण्याची संधी मिळाली नाही. त्यामुळे माझी अंडर 15 पश्चिम विभागीय संघातही निवड झाली नाही. प्रथम मी संघात निवड न झाल्याबद्दल दुःखी होतो आणि माझे पैसे संपले कारण मी माझे सर्व पैसे नाश्ता आणि फास्ट फूडवर खर्च केले होते.
 
सचिन सांगतो की जेव्हा मी दादर स्टेशनवर पोहोचलो तेव्हा घरी पोहोचण्यासाठी बसचे तिकीट काढण्याइतके पैसे माझ्याकडे नव्हते. मी माझ्या 2 मोठ्या बॅगा उचलल्या आणि शिवाजी पार्कमधल्या काकांच्या घराकडे निघालो. मी रस्त्याभर रडत होतो.
 
मी काकांच्या घरी पोहोचलो तेव्हा काकूंनी मला उदास पाहिले आणि कारण विचारले पण मी त्यांना जास्त काही सांगू शकलो नाही, एवढेच सांगितले की माझी तब्येत ठीक नाही. मी फास्ट फूड खाण्यासाठी पैसे खर्च केले होते, ते्वहा माहित नव्हतं की यासाठी खूप मोठी किंमत मोजावी लागेल.. 12 वर्षाच्या वयात इतकी समज कुठे असते...

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Amit Shah Road Show: कर्नाटकात गृहमंत्री अमित शहा यांच्या रोड शोमुळे जमली गर्दी, पाहा VIDEO