Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

बर्‍याच महिलांशी संबंध असलेल्या वक्तव्यावर अडकले पंड्या, राहुल यांना देखील नोटीस

बर्‍याच महिलांशी संबंध असलेल्या वक्तव्यावर अडकले पंड्या, राहुल यांना देखील नोटीस
भारतीय क्रिकेट कंट्रोल बोर्ड (बीसीसीआय) ने बुधवारी ऑलराउंडर हार्दिक पंड्या आणि ओपनर के. एल. राहुल यांना नोटिस बजावून जाब विचारला आहे. पंड्या आणि राहुल यांनी नुकतेच टीव्ही शोवर महिलांविषयी बोलून फॅन्सचे मन दुखावले आहे. बोर्ड आता खेळाडूंना अशा शो मध्ये भाग घेण्यास बंदी घालू शकतो अशी अंदाज बांधला जात आहे. 
 
कॉफी विद करण या शोमध्ये पंड्या यांच्या विधानाची व्यापक टीका केली गेली आहे, ज्यानंतर ऑलराउंडरने सोशल मीडियावर माफी मागितली आणि म्हटलं की तो शोच्या वार्‍यात वाहून असे बोलून गेला. तरी राहुलने यावर काही प्रतिक्रिया व्यक्त केलेली नाही.
 
प्रशासक समिती (सीओए) चे अध्यक्ष विनोद राय यांनी सांगितले, 'आम्ही हार्दिक पंड्या आणि केएल राहुल यांना त्यांच्या वक्तव्यांबद्दल नोटिस पाठवून जाब विचारला आहे. त्यांना 24 तासांत जाब द्यावा लागेल.' 
 
25 वर्षीय पंड्या आणि राहुल सोबतच चित्रपट निर्माते करण जोहर द्वारे होस्ट सेलिब्रिटी चॅट शोमध्ये गेले होते. ऑलराउंडर म्हणाले की ते शोच्या स्वरूपात जास्त वाहून गेले. तसेच कोणाच्या भावना दुखवायच्या त्यांचा हेतू मुळीच नव्हता. पंड्याने लिहिले, 'कॉफी विद करणमध्ये माझ्या विधानावर लक्ष देताना, ज्या कोणालाही मी दुखावले आहे त्या सर्वांची क्षमा मागतो. प्रामाणिकपणे, शोच्या स्वरूपाच्या दृष्टीने मी जास्तच वाहून गेलो. मला कोणाचा अपमान करायचा नव्हता किंवा कोणाच्या भावना दुखवायच्या नव्हत्या. आदर.' 
 
शो मध्ये पंड्याने बर्‍याच स्त्रियांबरोबर फिरणे आणि आपल्या पालकांशी मोकळा व्यवहार असल्याचे सांगितले. हे विचारल्यावर की क्लबमध्ये स्त्रीचे नाव नाही विचारले? यावर पंड्या म्हणाले, 'मला स्त्रियांना पाहायला आवडतं आणि ते कसे चालतात हे देखील पाहण्यास मला खूप रस आहे.'
 
यानंतर पंड्या यांची टीका झाली आणि बीसीसीआयच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनाही हे सहन झाले नाही. सूत्रांप्रमाणे आता अशा प्रकाराच्या शोमध्ये खेळाडूंना सामील होण्यास बंदी घातली जाऊ शकते.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

मनसे प्रमुख राज ठाकरे यांच्या सुनेबद्दल या पाच गोष्टी माहित आहेत का ?