Festival Posters

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

क्रिकेटर रिंकू सिंह आणि प्रिया सरोजचा साखरपुडा झाला

Cricketer Rinku Singh
, रविवार, 8 जून 2025 (15:40 IST)
भारतीय क्रिकेटपटू रिंकू सिंह आणि सपा खासदार प्रिया सरोज यांचा साखरपुडा आज रविवारी दुपारी 1 वाजता लखनौच्या 5 स्टार हॉटेल मध्ये झाला. दोन्ही कुटुंबातील 300 जण या समारंभात सहभागी झाले होते. या सोहळ्यात क्रिकेटपटू प्रवीणकुमार, पियुष चावला, युपी रणजी संघाचा कर्णधार आर्यन जुयालने हजेरी लावली. रिंकू सिंग रात्री उशिरा आपल्या कुटुंबासह हॉटेल मध्ये पोहोचले. येथे त्याने आपल्या कुटुंबातील आणि नातेवाईकांचे आशीर्वाद घेऊन त्यांना केक भरवला.
या सोहळ्याला अखिलेश यादव, डिम्पल यादव, प्रिया यांची जवळची मैत्रीण इकरा हसन या देखील उपस्थित होत्या. या सोहळ्यासाठी विशेष सुरक्षा व्यवस्था करण्यात आली होती. पाहुण्यांना विशेष पास देण्यात आले असून बारकोड स्कॅनिंग सिस्टम देखील बसवले होते. 
 
या सोहळ्यात जेवण्यासाठी लखनवी पदार्थांचा समावेश करण्यात आला होता. रिंकू आणि प्रिया यांच्या आवडीच्या पदार्थांची विशेष काळजी घेतली होती. 
ALSO READ: दोन वेळा विश्वविजेत्या भारतीय क्रिकेटपटू पीयूष चावलाने सर्व फॉरमॅटमधून निवृत्ती घेतली
रिंकू आणि प्रियाची भेट एका कॉमन मैत्रिणीच्या मार्फत झाली. ते दोघे एकमेकांना एका वर्षांपासून अधिक ओळखतात ते दोघे एकमेकांना पसंत करत होते. मात्र या नात्यासाठी त्यांना कुटुंबाच्या संमतीची आवश्यकता होती. दोन्ही कुटूंबियांनी या लग्नाला स्वीकृती दिली आहे. 
ALSO READ: आयपीएल 2025 च्या अंतिम सामन्यात कृणाल पांड्याने खास विक्रम रचला
तर प्रिया सरोज या वाराणसीतील कारखिया गावातील रहिवासी असून अनेक वर्षांपासून समाजवादी पक्षाशी सक्रियपणे जोडल्या गेल्या आहे. त्या 2024 मध्ये जौनपूर जिल्ह्यातील मछलीशहर मतदार संघाचे प्रतिनिधित्व करून लोकसभेवर निवडून आल्या. सर्वोच्च न्यायालयाच्या माजी वकील असलेल्या प्रियायांनी दिल्ली विद्यापीठातून कला आणि नोएडातील अमिटी विद्यापीठातून कायद्याची पदवी घेतली आहे. 
Edited By - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

शाहिद आफ्रिदीचा मृत्यू झाल्याचा व्हिडीओ व्हायरल