rashifal-2026

Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

भारतीय क्रिकेटर उमेश यादवच्या वडिलांचे निधन

cricketer umesh yadav father passed away
, गुरूवार, 23 फेब्रुवारी 2023 (11:00 IST)
भारतीय क्रिकेट संघाचा वेगवान गोलंदाज उमेश यादव याला पितृशोक झाला. उमेशचे वडील तिलक यादव यांनी वयाच्या 74 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. बुधवारी 22 फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडे सहाच्या सुमारास त्यांनी अखेरचा श्वास घेतला.
 
उमेशचे वडील गेल्या काही महिन्यांपासून आजारी होते आणि खासगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. 2 दिवसांपूर्वी त्यांना रुग्णालयातून घरी आणण्यात आले. तिलक यादव हे वलनी कोळसा खाणीत काम करायचे तसेच त्यांना कुस्तीची आवड होती. तिलक यांना दोन मोठ्या मुली आणि धाकटा मुलगा उमेश असे आहे.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

ताजिकिस्तानमध्ये 6.8 रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप, अफगाणिस्तान आणि चीनही हादरले