Publish Date: Fri, 02 Jun 2017 (12:30 IST)
Updated Date: Fri, 02 Jun 2017 (12:37 IST)
इंग्लंड संघाने चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये शानदार विजयी सलामी दिली. इंग्लंडने 8 गड्यांनी सामना जिंकून दमदार सुरुवात केली.
लियाम प्लंकेटच्या (4/59) धारदार गोलंदाजी पाठोपाठ ज्यो रूट (नाबाद 133), अॅलेक्स हेल्स (95) आणि कर्णधार इयान मोर्गनच्या (नाबाद 75) तुफानी फटकेबाजीच्या बळावर इंग्लंडने 47.2 षटकांत सामना जिंकला.
तमीम इक्बालच्या (128) शतकाच्या बळावर बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना निर्धारित 50 षटकांमध्ये 6 बाद 305 धावा काढल्या होत्या.
प्रत्युत्तरामध्ये ज्यो रूट आणि इयान मोर्गनने केलेल्या 143 धावांच्या भागीदारीच्या बळावर इंग्लंडने 2 गड्यांच्या मोबदल्यात लक्ष्य गाठले.
webdunia
Publish Date: Fri, 02 Jun 2017 (12:30 IST)
Updated Date: Fri, 02 Jun 2017 (12:37 IST)