स्वातंत्र्यदिनाच्या संध्याकाळी भारताचा माजी कर्णधार आणि यष्टीरक्षक महेंद्रसिंग धोनी यानं आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे. T20 आणि एकदिवसीय क्रिकेटमधून त्याने निवृत्तीचा निर्णय जाहीर केला आहे. आंतरराष्ट्रीय टेस्ट क्रिकेट मधून यापूर्वीच धोनीने निवृत्ती घेतली होती.
गेल्या अनेक दिवसांपासून त्याच्या निवृत्तीच्या चर्चा रंगल्या होत्या. अखेर १५ ऑगस्टच्या दिवशीच महेंद्र सिंग धोनी याने आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली. धोनी आंतरराष्ट्रीय T20 मधून निवृत्त झाला असला, तरी IPL मध्ये मात्र तो दिसत राहणार आहे.
आता आंतरराष्ट्रीय एकदिवस आणि टी20 क्रिकेटमध्ये एकदिवसीय विश्वचषक, T20 विश्वचषक आणि चँपियन्स ट्रॉफी या ICC च्या तीनही महत्त्वाच्या स्पर्धा धोनी कर्णधारपदी असताना भारताने जिंकल्या आहेत. त्यामुळे माहीला आतापर्यंतचा सर्वात यशस्वी कर्णधार मानलं जात होतं.
निवृत्तीची घोषणा करण्यासाठी धोनीने शायराना अंदाजात व्हिडिओ शेअर केला आहे ज्यात 'मैं पल दो पल का शायर हूँ' असं गाण वाजत असून त्यात त्याने पूर्वीपासूनचे फोटोंचा कोलाज केले आहे.