महेंद्रसिंह धोनीच्या प्रत्येक हालचालीवर त्याच्या जगभरातील चाहत्यांकडून बारीक लक्ष ठेवले जाते. धोनी सध्या चेन्नईमध्ये आहे आणि येत्या इंडियन प्रीमियर लीग (आयपीएल) 2021 ची तयारी करत आहे.
या पार्श्वभूमीवर माजी भारतीय कर्णधाराचा नवीन लूक व्हायरल झाला. त्याच्या या नव्या अवताराने त्याने चाहत्यांना भ्रमात टाकले आहे.
स्टार स्पोट्र्सच्या अधिकृत टि्वटर हँडलवर धोनीची एक छोटी व्हिडिओ क्लिप शेअर केली आहे. त्याच्या डोक्यावर केस नाहीत, त्याने भिक्षूचे कपडे धारण केले आहेत. ही प्रतिमा काहीवेळातच व्हायरल झाली आणि त्याच्या नवीन लूकमागील हेतू काय असू शकतो, याचा अंदाज त्याच्या चाहत्यांनी लावायला सुरूवात देखील केली आहे. या एका नव्या लूकमध्ये तो चाहत्यांसमोर प्रकट झाला आहे आणि क्या है इस अवतार के पिछे का मंत्रा, जल्द ही आपको पता चलेगा असे बोलून आपल्या चाहतंना त्याने आणखी भ्रमात टाकले आहे. स्टार स्पोर्टस्च्या टि्वटर अकाउंटने आपल्या सोशल मीडिया हँडल्सवर पोस्ट शेअर केली असून त्यास कॅप्शन दिले आहे की, यंत्र अवतार आम्हीसुध्दा तुमच्यासारखेच विचारात पडलो आहोत. धोनी ज्याबद्दल बोलत आहे, काय आहे हा मंत्र. याबद्दल तुमचा अंदाज आम्हाला सांगा आणि त्याबद्दल जाणून घेण्यासाठी आम्हाला फॉलो करत राहा. आयपीएलच्या 14 व्या हंगामासाठी धोनीचा हा नवा लूक एका नवीन जाहिरातीसाठी असण्याची अपेक्षा आहे.