दुलीप ट्रॉफीमध्ये भारतीय युवा खेळाडू दमदार कामगिरी करताना दिसत आहेत. देशांतर्गत स्पर्धेची दुसरी फेरी सुरू झाली आहे.शनिवारी भारत डी संघाला 488 धावांचे लक्ष्य मिळाले होते.
दुसऱ्या डावात भारत डी संघाची धावसंख्या 62/१1 आहे. तर, भारत ब संघ संघर्ष करताना दिसत आहे. पहिल्या डावात भारत ब संघाने 101 षटकात 309 धावा केल्या आहेत. त्याच्या सात विकेट पडल्या आहेत. सध्या संघ 216 धावांनी पिछाडीवर आहे.
शनिवारी प्रथम सिंग आणि टिळक वर्मा यांनी शतकी खेळी खेळली. भारत अ संघाकडून दुसऱ्या डावाची सलामी देण्यासाठी आलेल्या प्रथम सिंगने 12 चौकार आणि 1 षटकाराच्या मदतीने 122 धावांची दमदार खेळी केली. याशिवाय टिळक वर्माने नऊ चौकारांच्या मदतीने 11 धावांची प्रभावी खेळी केली. टिळकांच्या प्रथम श्रेणी कारकिर्दीतील हे पाचवे शतक आहे.