शमीची पत्नी हसीन जहाँ हिने शामी विरुध्द कोलकात्यातील जाधवपूर पोलिस ठाण्यात तक्रार केली आहे. या तक्ररीवरुन शामीविरोधात खुनाचा प्रयत्न आणि बलात्कारासारख्या गंभीर कलमांखाली एफआयआर दाखल केली गेली आहे.
शामीवर त्याच्या पत्नीने विवाहबाह्य संबधाबरोबरच मॅच फिक्सिंगचे आरोप करुन एकच खळबळ उडवून दिली होती. त्यात जाधवपूर पोलिस ठाण्यात हसीन जाहाँने तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीवरुन शामीवर भारतीय दंड संहिता ४९८ अ (छळवणूक) याचबरोबर ३०७ ( खुनाचा प्रयत्न ), ३७६ (बलात्कार ) यासारखी अनेक कलमे लावली आहेत. त्यामुळे शमीच्या अडचणीत येत्या काळात वाढ होण्याची चिन्हे दिसत आहेत.