Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन

माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर यांचे निधन
, गुरूवार, 16 ऑगस्ट 2018 (08:44 IST)
भारताचे माजी क्रिकेटपटू अजित वाडेकर (७७) यांचं निधन झालं आहे. जसलोक रुग्णालयात वाडेकर यांनी अखेरचा श्वास घेतला. अजित वाडेकर यांच्याच नेतृत्वामध्ये भारतानं परदेशामध्ये पहिली टेस्ट सीरिज जिंकली होती. अजित वाडेकर कर्णधार असताना भारतानं १९७१ साली वेस्ट इंडिजमध्ये आणि इंग्लंडमध्ये टेस्ट सीरिज जिंकली होती.
 
१ एप्रिल १९४१ रोजी अजित वाडेकर यांचा जन्म झाला होता. १९५८ मध्ये त्यांनी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळायला सुरुवात केली. १९६६ साली वाडेकरांनी भारताकडून आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदापर्ण केलं. अजित वाडेकर यांना १९६७ साली अर्जुन पुरस्कारानं आणि १९७२ साली पद्मश्री पुरस्कारानं गौरवलं गेलं.अजित वाडेकर यांनी ३७ मॅच आणि ७१ इनिंगमध्ये ३१.०७ च्या सरासरीनं २,११३ रन केले होते. यामध्ये एक शतक आणि १४ अर्धशतकांचा समावेश होता. प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये वाडेकर यांनी २३७ मॅचमध्ये ४७.०३ च्या सरासरीनं १५,३८० रन केल्या होत्या. यामध्ये ३६ शतकं आणि ८४ अर्धशतकांचा समावेश होता. 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

वाजपेयी यांची प्रकृती चिंताजनक