आपल्या अष्टपैलू खेळासह पांड्या त्याच्या हेअर स्टाईलमुळेही तितकाच प्रसिद्ध झाला आहे. चॅम्पियन् करंडकात अंतिम सामन्यात हार्दिक पांड्याने केलेल्या खेळीमुळे पांड्या चर्चेत आला होता. महत्तवाची गोष्ट म्हणजे भारताच्या महाणथी फलंदाजांनी नांगीटाकल्यानंतरही पांड्याने पाकिस्तानी गोलंदाजांना नेटाने सामना केला होता. नुकतीच हार्दिक पांड्याने आपली हेअर स्टाईल बदलली असून, या नवीन लूकचा फोटो इन्स्टाग्राम अकाऊंटवर शेअर केला आहे. सेलिब्रेटी हेअर स्टायलिस्ट हकमी आलीमने पांड्याला हा नवीन लूक दिला आहे. हकीमसोबत आपला फोटो टाकत पांड्याने, मला हा नवीन लूक प्रचंड आवडला आहे, तू खरच जादूगर आहेस! असे म्हटले आहे.