Team India New ODI Jersey : भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार हरमनप्रीत कौर आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे (बीसीसीआय) सचिव जय शाह यांनी शुक्रवारी येथे बोर्डाच्या मुख्यालयात संघाच्या नवीन जर्सीचे अनावरण केले.
22 डिसेंबरपासून वडोदरा येथे सुरू होणाऱ्या वेस्ट इंडिजविरुद्धच्या तीन सामन्यांच्या वनडे मालिकेदरम्यान महिला संघ नवीन जर्सी परिधान करेल.
हरमनप्रीत म्हणाली, “जर्सीचे अनावरण करणे ही एक सन्मानाची गोष्ट आहे आणि आम्ही वेस्ट इंडिज संघाविरुद्ध ही जर्सी घालणारा पहिला संघ आहोत याचा खरोखर आनंद आहे. मला ही जर्सी खूप आवडते आणि आम्हाला एकदिवसीय सामन्यांसाठी खास जर्सी मिळाली याचा खरोखर आनंद आहे.”
वेस्ट इंडिजविरुद्धच्या घरच्या मालिकेपूर्वी, हरमनप्रीतच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ ऑस्ट्रेलियाच्या दौऱ्यावर जाईल जेथे 5 ते 11 डिसेंबर दरम्यान तीन सामन्यांची एकदिवसीय मालिका खेळेल.
हरमनप्रीत म्हणाली की, भारतीय संघाची जर्सी घालणे नेहमीच खास असते कारण ते मिळवण्यासाठी खूप मेहनत करावी लागते.
ती म्हणाली, “भारतीय चाहत्यांनीही ही जर्सी परिधान केल्याचा अभिमान वाटावा अशी माझी इच्छा आहे.”