इंग्लंडविरुद्धच्या वनडे मालिकेत भारतीय संघाने चमकदार कामगिरी करत तीन सामन्यांची मालिका 3-0 अशी जिंकली. या मालिकेत चांगली कामगिरी करणाऱ्या भारतीय महिला खेळाडूंना आयसीसी क्रमवारीतही फायदा झाला आहे. या मालिकेत 221 धावा करणाऱ्या भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने फलंदाजांच्या क्रमवारीत चार स्थानांनी प्रगती करत पाचव्या स्थानावर झेप घेतली आहे. त्याचवेळी स्मृती मानधना एका स्थानाच्या फायद्यासह सहाव्या स्थानावर पोहोचली आहे.
रेणुका सिंगला 35 स्थानांचा फायदा झाला आहे. महिला गोलंदाजांच्या एकदिवसीय क्रमवारीत ती 35 व्या स्थानावर पोहोचली आहे. त्याचवेळी झुलन गोस्वामीने पाचवे स्थान मिळवून करिअर पूर्ण केले. न्यूझीलंडविरुद्धच्या वनडे मालिकेत वेस्ट इंडिजची कर्णधार हेली मॅथ्यूजने अष्टपैलू कामगिरी केली होती. अष्टपैलू खेळाडूंच्या क्रमवारीत ती प्रथम स्थानी आहे. तिलातीन स्थानांचा फायदा झाला.
न्यूझीलंडविरुद्धच्या मालिकेत तिने 5 विकेट घेतल्या आणि 88 धावा केल्या. या मालिकेत ती वेस्ट इंडिजसाठी सर्वाधिक धावा करणारी खेळाडू होती. त्याचबरोबर विकेट घेण्याच्या बाबतीत ती संयुक्तपणे पहिल्या स्थानावर होती.