Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

ICC Women’s T20 World Cup: 10 संघ खेळणार, 23 सामने महिला T20 विश्वचषका बद्दल जाणून घ्या

mahila cricket
, शुक्रवार, 3 फेब्रुवारी 2023 (16:32 IST)
10 फेब्रुवारीपासून दक्षिण आफ्रिकेत आठव्या महिला टी-20 विश्वचषकाला सुरुवात होत आहे. 17 दिवस चालणाऱ्या या स्पर्धेत 10 संघ सहभागी होणार आहेत. या कालावधीत एकूण 23 सामने खेळवले जाणार आहेत. भारताची नजर प्रथमच विजेतेपदावर आहे. टीम इंडिया शेवटची 2020 मध्ये अंतिम फेरीत पोहोचली होती, पण ऑस्ट्रेलियाविरुद्ध पराभवाचा सामना करावा लागला होता.
 
महिला टी-20 विश्वचषक 10 ते 26 फेब्रुवारी दरम्यान दक्षिण आफ्रिकेत होणार असून या स्पर्धेत यजमान दक्षिण आफ्रिके व्यतिरिक्त गतविजेत्या ऑस्ट्रेलिया, भारत, इंग्लंड, वेस्ट इंडिज, न्यूझीलंड, आयर्लंड, श्रीलंका, बांगलादेश आणि पाकिस्तानचे संघ सहभागी होणार आहेत.यजमान दक्षिण आफ्रिकेने या स्पर्धेत स्थान निश्चित केले होते. त्यानंतर 30 नोव्हेंबर 2021 पर्यंत आयसीसी क्रमवारीत अव्वल सात संघांना स्थान मिळाले. यानंतर 37 संघांमध्ये दोन जागांसाठी स्पर्धा झाली. बांगलादेश आणि आयर्लंडने क्वालिफायरमध्ये प्रवेश केला.
दक्षिण आफ्रिकेतील तीन मैदानांवर या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. केपटाऊनमधील न्यूलँड्स ग्राऊंड, पार्लमधील बोलँड पार्क आणि पोर्ट एलिझाबेथ (एबेरेहा) येथील सेंट जॉर्ज पार्क येथे सामने खेळवले जातील.
महिला T20 विश्वचषकाचा पहिला सामना यजमान दक्षिण आफ्रिका आणि श्रीलंका यांच्यात 10 फेब्रुवारी रोजी केपटाऊनमध्ये खेळवला जाणार आहे.26 फेब्रुवारी (रविवार) रोजी केपटाऊन येथील न्यूलँड्स मैदानावर अंतिम सामना खेळवला जाईल.
 
स्पर्धेतील 10 सहभागी संघांची दोन गटात विभागणी करण्यात आली आहे. दक्षिण आफ्रिकेसह ऑस्ट्रेलिया, श्रीलंका, बांगलादेश आणि न्यूझीलंड हे गट-अ मध्ये आहेत. ब गटात भारतासह इंग्लंड, आयर्लंड, पाकिस्तान आणि वेस्ट इंडिज आहेत.

केपटाऊनमध्ये 12 फेब्रुवारीला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानविरुद्धच्या स्पर्धेत भारत आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. त्यानंतर 15 फेब्रुवारीला याच मैदानावर वेस्ट इंडिजविरुद्ध सामना होणार आहे. पोर्ट एलिझाबेथ येथे अनुक्रमे 18 आणि 20 फेब्रुवारीला इंग्लंड आणि आयर्लंड यांच्यात सामने होणार आहेत.
 
 
Edited By - Priya Dixit  
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Documentary Controversy: डॉक्युमेंटरीवर सर्वोच्च न्यायालयाची सूचना