Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IND v AUS 3rd Test LIVE SCORE: टीम इंडिया अडचणीत

rohit sharma
, बुधवार, 1 मार्च 2023 (11:40 IST)
IND vs AUS 3rd Test LIVE Score And Updates: भारत आणि ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट संघ इंदूरच्या होळकर स्टेडियमवर तिसर्‍या कसोटी सामन्यात आमनेसामने आहेत. पहिले दोन कसोटी सामने जिंकल्यानंतर भारतीय संघ 4 सामन्यांच्या मालिकेत 2-0 ने पुढे आहे. हा कसोटी सामना जिंकून टीम इंडिया मालिकेवर कब्जा करण्यासोबतच वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीतही स्थान निश्चित करेल. या कसोटी सामन्यात स्टीव्ह स्मिथ ऑस्ट्रेलियाचे कर्णधार आहे. संघाचा नियमित कर्णधार पॅट कमिन्स वैयक्तिक कारणांमुळे मायदेशी परतला आहे. घरच्या भूमीवर सलग 16वी कसोटी मालिका जिंकण्यासाठी टीम इंडियाचा डोळा आहे. भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला आहे. भारताने प्लेइंग इलेव्हनमध्ये दोन बदल केले आहेत. सलामीवीर केएल राहुलच्या जागी शुभमन गिलला संधी मिळाली आहे तर मोहम्मद शमीऐवजी उमेश यादवचा भारतीय संघात समावेश करण्यात आला आहे. वेगवान गोलंदाज मिचेल स्टार्क आणि अष्टपैलू कॅमेरून ग्रीन यांचे ऑस्ट्रेलियन संघात पुनरागमन झाले आहे.

India vs Australia Live Score & Updates: लंच ब्रेकवर भारत 84/7
India vs Australia Live Score & Updates: भारताने लंच ब्रेकपर्यंत पहिल्या डावात 7 गडी गमावून 84 धावा केल्या आहेत. अश्विन 1 धावा करून खेळत आहे तर अक्षर पटेल 6 धावांवर नाबाद परतला. याआधी भारताने 7 विकेट झटपट गमावल्या होत्या. इंदूर कसोटीच्या पहिल्या दिवशी पहिल्या सत्रात कांगारू फिरकीपटूंनी शानदार गोलंदाजी केली.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

अर्थसंकल्पीय अधिवेशन: 'विधिमंडळ हे चोरमंडळ', संजय राऊतांच्या विधानावरुन गदारोळ