India vs Australia (IND vs AUS) 3rd ODI : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील वनडे मालिकेतील तिसरा आणि शेवटचा सामना चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर खेळवला जाणार आहे. हा सामना भारतासाठी खूप महत्त्वाचा आहे. हार्दिक पांड्याच्या नेतृत्वाखाली पहिली वनडे पाच विकेट्सने जिंकल्यानंतर, रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली टीम इंडियाला दुसऱ्या वनडेत 10 गडी राखून पराभव पत्करावा लागला. अशा स्थितीत तिसऱ्या आणि शेवटच्या सामन्यातून मालिकेचा निर्णय होईल.
या मालिकेत भारतीय टॉप ऑर्डरची कामगिरी अत्यंत खराब झाली आहे. पहिल्या सामन्यात संघाने 39 धावांत चार विकेट गमावल्या होत्या. त्याचवेळी दुसऱ्या सामन्यात संपूर्ण संघ 117 धावांवर बाद झाला. अशा स्थितीत तिसऱ्या वनडेत रोहित अँड कंपनीला चांगली फलंदाजी करावी लागणार आहे.
दुसऱ्या एकदिवसीय सामन्यात मिचेल मार्श आणि ट्रॅव्हिस हेड यांच्यासमोर भारताचे गोलंदाजही खूपच खराब झाले होते. जर टीम इंडिया हरली तर मार्च 2019 नंतर घरच्या मैदानावर टीम इंडियाचा हा पहिला मालिका पराभव असेल. मार्च 2019 मध्ये, ऑस्ट्रेलियाने पाच एकदिवसीय सामन्यांच्या मालिकेत भारताचा 3-2 ने पराभव केला होता. चेन्नईत भारत आणि ऑस्ट्रेलिया वनडेमध्ये दोनदा आमनेसामने आले आहेत. एक सामना भारताने तर एक ऑस्ट्रेलियाने जिंकला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा एकदिवसीय सामना 22 मार्च म्हणजेच बुधवारी चेन्नईच्या एम चिदंबरम स्टेडियमवर भारतीय वेळेनुसार दुपारी 1.30 वाजता खेळवला जाईल. नाणेफेक दुपारी 1 वाजता होईल.भारत आणि ऑस्ट्रेलिया वनडे मालिका प्रसारित करण्याचे अधिकार स्टार स्पोर्ट्स नेटवर्ककडे आहेत. हा सामना तुम्ही स्टार स्पोर्ट्सच्या वेगवेगळ्या चॅनेलवर हिंदी आणि इंग्रजी व्यतिरिक्त देशातील इतर भाषांमध्ये कॉमेंट्रीसह पाहू शकता.
दोन्ही संघांचे संभाव्य प्लेइंग-11
भारत: शुभमन गिल, रोहित शर्मा (कर्णधार), विराट कोहली, सूर्यकुमार यादव, केएल राहुल (विकेटकीपर), हार्दिक पंड्या, रवींद्र जडेजा, अक्षर पटेल, कुलदीप यादव, मोहम्मद शमी, मोहम्मद सिराज.
ऑस्ट्रेलिया : ट्रॅव्हिस हेड, मिचेल मार्श, स्टीव्ह स्मिथ, मार्कस लॅबुशेन, अॅलेक्स कॅरी, कॅमेरॉन ग्रीन, मार्कस स्टॉइनिस, शॉन अॅबॉट, नॅथन एलिस, अॅडम झाम्पा, मिचेल स्टार्क.