भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरू असलेल्या पाच कसोटी सामन्यांच्या बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी 2024-25 चा तिसरा सामना ब्रिस्बेनच्या गाबा येथे खेळला जात आहे. भारतीय कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून ऑस्ट्रेलियाला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले.
उपाहारापर्यंत ऑस्ट्रेलियाने 13.2 षटकात एकही बाद 28 धावा केल्या आहेत. टीम इंडिया मैदानात उतरताच विराट कोहलीने एक मोठा विक्रम आपल्या नावावर केला. ऑस्ट्रेलियाविरुद्ध कोहलीचा हा 100 वा सामना आहे. अशी कामगिरी करणारा तो सचिन तेंडुलकरनंतर जगातील दुसरा खेळाडू ठरला आहे.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक सामने खेळण्याचा विक्रम सचिन तेंडुलकरच्या नावावर आहे. सचिनने कांगारूंविरुद्ध 110 सामने खेळले. आता या यादीत विराट कोहलीनेही आपले स्थान निर्माण केले आहे. जागतिक क्रिकेटमध्ये एका संघाविरुद्ध सर्वाधिक सामने खेळणाऱ्या खेळाडूंच्या यादीत श्रीलंकेचे दोन दिग्गज जयसूर्या आणि जयवर्धने यांचाही समावेश आहे.
एका संघाविरुद्ध सर्वाधिक सामने खेळलेले खेळाडू
110 – सचिन तेंडुलकर विरुद्ध ऑस्ट्रेलिया
110 – महेला जयवर्धने विरुद्ध भारत
109 - सचिन तेंडुलकर विरुद्ध श्रीलंका
105 – सनथ जयसूर्या विरुद्ध पाकिस्तान
103 – सनथ जयसूर्या वि. भारत
103 - महेला जयवर्धने विरुद्ध पाकिस्तान
100 – विराट विरुद्ध ऑस्ट्रेलिया*