रविवारी अंडर-19 आशिया चषकाच्या अंतिम फेरीत भारताचा सामना बांगलादेशशी झाला. अंडर-19 आशिया चषक स्पर्धेच्या अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताचा 59 धावांनी पराभव करत विजेतेपद पटकावले. या सामन्यात बांगलादेशने प्रथम फलंदाजी करत 198 धावा केल्या होत्या. प्रत्युत्तरात भारताला 35.2 षटकांत 10 गडी गमावून केवळ 139 धावा करता आल्या.
बांगलादेशने सलग दुसऱ्यांदा अंडर-19 आशिया चषकाचे विजेतेपद पटकावण्यात यश मिळविले. दुबईत झालेल्या अंतिम सामन्यात बांगलादेशने भारताचा 59 धावांनी पराभव केला. बांगलादेशने प्रथम फलंदाजी करताना रिझान हुसेनच्या 47 धावांच्या खेळीमुळे 49.1 षटकात 10 गडी गमावून 198 धावा केल्या. प्रत्युत्तरात भारतीय संघ केवळ 139 धावा करू शकला आणि 35.2 षटकांत सर्वबाद झाला.
सलग दुसऱ्यांदा अंडर-19 आशिया चषकाचे विजेतेपद पटकावले. यापूर्वी गेल्या वर्षी त्यांनी संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) 195 धावांनी पराभव केला होता.अंडर-19 आशिया कपचा हा 11वा सीझन आहे. भारतीय संघाने आठ वेळा या स्पर्धेचे विजेतेपद पटकावले आहे. याआधी 2023 च्या अंडर-19 आशिया कपच्या उपांत्य फेरीत भारताचा बांगलादेशकडून चार विकेट्सनी पराभव झाला होता. प्रथम फलंदाजी करताना भारतीय संघाने मुशीर खानच्या 50 धावांच्या खेळीमुळे 188 धावा केल्या. प्रत्युत्तरात बांगलादेशने 42.5 षटकांत 189 धावा करत विजय मिळवला आणि अंतिम फेरीत स्थान पक्के केले.