Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

Ind vs SA 3rd Test केपटाऊन कसोटीत भारताचा पराभव. भारताचे आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले

Ind vs SA 3rd Test LIVE: केपटाऊन कसोटीत भारताचा पराभव. भारताचे आफ्रिकेत पहिली कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न भंगले
, शुक्रवार, 14 जानेवारी 2022 (17:23 IST)
भारत आणि दक्षिण आफ्रिका यांच्यातील तीन सामन्यांच्या मालिकेतील निर्णायक सामना केपटाऊनच्या न्यूलँड्स स्टेडियमवर संपला. हा सामना दक्षिण आफ्रिकेने जिंकला आहे. त्याचवेळी कसोटी गमावल्यानंतर भारताचे दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या कसोटी मालिकेचे स्वप्नही भंगले. भारताने नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला, पण संघ 223 धावा करू शकला. विराट कोहलीने सर्वाधिक 79 धावा केल्या. चेतेश्वर पुजारानेही 43 धावांची खेळी खेळली. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेचा पहिला डाव जसप्रीत बुमराहच्या पाच विकेट्सच्या जोरावर 210 धावांत आटोपला. अशाप्रकारे भारताला 13 धावांची किरकोळ आघाडी मिळाली आणि त्यानंतर भारतीय संघ दुसऱ्या डावात 198 धावाच करू शकला, ज्यामध्ये ऋषभ पंतच्या शतकाचा समावेश होता. अशाप्रकारे दक्षिण आफ्रिकेला विजयासाठी212 धावांचे लक्ष्य मिळाले
केपटाऊनमध्ये खेळल्या जात असलेल्या तिसऱ्या कसोटी सामन्यात दक्षिण आफ्रिकेने विजय मिळवला आहे. दक्षिण आफ्रिकेने हा सामना 7 विकेटने जिंकला. या सामन्यासह भारताने ही मालिकाही गमावली आहे. आफ्रिकेने ही मालिका 2-1 ने जिंकली आहे. या सह भारताचे दक्षिण आफ्रिकेतील पहिल्या कसोटी मालिका जिंकण्याचे स्वप्न देखील भंगले आहेत. 
 

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

Asia Cup Hockey Tournament: 21 ते 28 जानेवारी दरम्यान मस्कट येथे होणाऱ्या स्पर्धेत गोलरक्षक सविता पुनियाला मिळाले कर्णधारपद