भारताने तिसऱ्या T20 सामन्यात दक्षिण आफ्रिकेचा 11 धावांनी पराभव करत चार सामन्यांच्या मालिकेत 2-1 अशी आघाडी घेतली आहे. सेंच्युरियनमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात वेगवान गोलंदाज अर्शदीप सिंगने शेवटच्या षटकात मार्को यानसेनची विकेट घेत भारताचे पुनरागमन केले.
या सामन्यात यजमानांनी नाणेफेक जिंकून भारताला प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले होते. टिळक वर्माच्या 107* आणि अभिषेक शर्माच्या 50 धावांच्या जोरावर भारताने 20 षटकांत 6 गडी गमावून 219 धावा केल्या. प्रत्युत्तरात दक्षिण आफ्रिकेला 20 षटकांत 7 गडी गमावून केवळ 208 धावा करता आल्या. या विजयानंतर टीम इंडियाचे लक्ष आता चौथ्या आणि अंतिम सामन्यावर असेल. शुक्रवार, 15 नोव्हेंबर रोजी जोहान्सबर्ग येथे हा सामना होणार आहे.
टीम इंडियाने टी-20 मध्ये 200 हून अधिक धावा करण्याची या वर्षातील ही आठवी वेळ आहे. भारतीय संघ एका कॅलेंडर वर्षात खेळाच्या सर्वात लहान फॉरमॅटमध्ये सर्वाधिक वेळा 200+ धावा करणारा पहिला संघ बनला आहे.