जोहान्सबर्ग कसोटीत दक्षिण आफ्रिकेने भारतावर 7 गडी राखून मात केली. दक्षिण आफ्रिकेने 240 धावांचे लक्ष्य 67.4 षटकांत चौथ्या दिवशी तीन विकेट गमावून पूर्ण केले. यासह तीन सामन्यांच्या कसोटी मालिकेत 1-1 अशी बरोबरी झाली आहे. दक्षिण आफ्रिकेकडून कर्णधार डील एल्गरने सर्वाधिक 96 धावा केल्या आणि शेवटपर्यंत नाबाद राहिले. भारताकडून मोहम्मद शमी, शार्दुल ठाकूर आणि अश्विनने 1-1 विकेट घेतली. भारताचा दुसरा डाव 266 धावांत आटोपला. दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 229 धावा केल्या. त्याचवेळी भारताचा पहिला डाव 202 धावांवर आटोपला. शेवटची कसोटी केपटाऊनमध्ये खेळवली जाणार आहे.
भारताने पहिल्या डावात 202 धावा केल्या होत्या. तर दक्षिण आफ्रिकेने पहिल्या डावात 229 धावा केल्या. भारताने दुसऱ्या डावात 266 धावा केल्या आणि त्यामुळे दक्षिण आफ्रिकेसमोर 240 धावांचे लक्ष्य ठेवले. कर्णधार डीन एल्गरने नाबाद 96 धावांची जबरदस्त खेळी करत संघाला विजयापर्यंत नेले. याशिवाय डुसेनने 40 धावा केल्या.
विराट कोहलीच्या अनुपस्थितीत केएल राहुल या कसोटी सामन्यात भारताचे नेतृत्व करत होते .