Select Your Language

Notifications

webdunia
webdunia
webdunia
webdunia

IND vs SL: फिरकीपटू वानिंदू हसरंगा T20 मालिकेतून बाहेर

IND vs SL: फिरकीपटू वानिंदू हसरंगा T20 मालिकेतून बाहेर
, बुधवार, 23 फेब्रुवारी 2022 (16:19 IST)
श्रीलंकेचा स्टार फिरकीपटू वानिंदू हसरंगा भारताविरुद्धच्या तीन सामन्यांच्या टी-20 मालिकेतून बाहेर झाले आहे. ते अद्याप कोविडच्या विळख्यातून बरे  झाले नाही. आठवडाभरापूर्वी ऑस्ट्रेलिया मालिके दरम्यान हसरंगा कोविड पॉझिटिव्ह आढळले  होते , त्यानंतर आता ताज्या चाचणीत त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 

\ऑस्ट्रेलियाविरुद्ध नुकत्याच संपलेल्या मालिकेत, कुसल मेंडिस आणि बिनुरा फर्नांडो यांच्यासह हसरंगाचा कोविड अहवाल पॉझिटिव्ह आला होता. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पाच सामन्यांच्या T20I मालिकेत श्रीलंकेचा 1-4 असा पराभव झाला.

श्रीलंका क्रिकेटने ट्विट करून लिहिले की, “कोविड पॉझिटिव्ह आढळल्यानंतर आयसोलेशनमध्ये असलेल्या वानिंदू हसरंगाचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. 22 फेब्रुवारी रोजी खेळाडूंची रॅपिड अँटीजेन चाचणी (RAT) करण्यात आली. पीसीआर चाचणीनेही निकालाची पुष्टी केली.
 
IPL 2022 च्या लिलावात हसरंगा हा IPL इतिहासातील सर्वात महागडा श्रीलंकेचा खेळाडू ठरला, त्याला रॉयल चॅलेंजर्स बंगलोरने IPL 2022 च्या मेगा लिलावात 10.75 कोटी रुपयांना विकत घेतले.

Share this Story:

Follow Webdunia marathi

पुढील लेख

तसंच आता होऊ देऊ नका म्हणत चंद्रकांत पाटील यांचा टोला